Talegaon Dabhade News : कोविड केअर सेंटर मध्ये रमजान ईद साजरी

एमपीसी न्यूज – कोविड केअर सेंटर मध्ये रमजान ईद व छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आफताब सय्यद, इझमाम सय्यद व अतुल राऊत यांच्या वतीने शुक्रवारी (दि. 14) कोरोना रुग्णांना शीरखुर्मा वाटप करण्यात आला.

मावळ तालुक्यातील कोरोना रुग्णांना रमजान ईद साजरा करता यावा तसेच हा सण हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन हिंदू-मुस्लिम ऐक्य निर्माण करणारा असल्यामुळे हा सण कोरोना रुग्णांसोबत साजरा करण्यात आला. कोरोना रुग्णांना शीर खुर्म्याचा आस्वाद मिळाल्याने रुग्णांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था कोविड केअर सेंटर व इंदोरी येथील तोलानी कोविड केअर सेंटर मध्ये डॉक्टर, नर्स व कोरोना रुग्णांना शीरखुर्मा वाटप केला.

याप्रसंगी आफताब सय्यद, अतुल राऊत, इझमाम सय्यद, मयुर झोडगे, अँड विनय दाभाडे, डॉ. पद्मवीर थोरात, डॉ मनीषा गावंडे, डॉ. चेताली पुयाद, डॉ. तेजस्विनी पानसरे, नर्स कौशल्य मुंडे, लक्ष्मी धोत्रे, वैशाली अंभोरे, रमा वाघमारे, मेघा भरगिरे, अश्विनी कांबळे, गौतमी शिंदे, दिक्षा सुरवडे, दिक्षा तायडे, हेमलता शहारे, विजय नवगिरे, अविनाश धेंडे व कोरोना रुग्ण उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.