Talegaon Dabhade : सामाजिक उपक्रम राबवून श्री भैरवनाथ महाराज व श्री बापूजीबुवा महाराज उत्सव साजरा 

एमपीसी न्यूज – साळुंब्रे मावळ येथील श्री भैरवनाथ महाराज व श्री बापूजीबुवा महाराज उत्सव दरवर्षी  ‘चैत्र कृ द्वादशी ‘  या तिथीला साजरा होत असतो. यंदाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या एकत्रित येण्यास शासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे यंदाचा उत्सव साधेपणाने फक्त धार्मिक विधी करून व सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. वाफ यंत्र, मास्क व सॅनिटायझर तसेच फळे वाटप करण्यात आली. 

सालाबादप्रमाणे चैत्र कृ द्वादशी या तिथीला होणारा श्री भैरवनाथ महाराज आणि श्री बापूजीबुवा महाराज उत्सव साळुंब्रे ग्रामस्थांनी रक्तदान करून साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने शासनाच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, साळुंब्रे आणि अथर्व ब्लड बँक, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि ८) रोजी ग्रामदैवतांच्या वार्षिक उत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सुमारे 40 ग्रामस्थांनी या उपक्रमात सहभागी होत रक्तदान केले. महिलांचा देखील लक्षणीय सहभाग यानिमित्ताने पाहावयास मिळाला.

भैरवनाथ युवा मंचच्या वतीने या वेळी रक्तदात्यांना विद्युत वाफ घेण्याचे यंत्राचे वाटप करण्यात आले. भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष निलेश राक्षे यांच्यांकडून रक्तदात्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. तसेच साळुंब्रे वि.वि.का. सोसायटीचे संचालक निलेश विधाटे यांनी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले, तर अखंड हरिनाम सप्ताह कमिटीचे अध्यक्ष सतीश राक्षे यांच्यावतीने फळवाटप करण्यात आले.

यानिमित्त माजी आदर्श सरपंच धनंजय विधाटे, माजी ग्रामपंचायत सदस्य धनंजय नाना राक्षे, शांताराम राक्षे, संतोष गुलाबराव राक्षे, हभप विठठल शेळके, माजी उपसरपंच दिलीप राक्षे, सुरेश भिकाजी राक्षे, कैलास यादव, एकनाथ कडेकर, बाबासाहेब राक्षे, श्रीनिवास राक्षे, समीर राक्षे आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.