Vadgaon Maval News : कोरोना नियमाचे पालन करून वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांचा उत्सव साजरा

एमपीसी न्यूज –  तालुक्यातील असंख्य भाविक, भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांचा उत्सव, चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंतीला संपन्न होत असतो. या वर्षी कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फक्त पहाटे 4 वाजता मंदिरात अभिषेक, आरती  व 6:30 वाजता हनुमान मंदिर या ठिकाणी हनुमान जन्म उत्सव व नंतर गुरव वाडा ते श्री पोटोबा मंदिर पालखी ग्राम दिंडी प्रदक्षणा शासनाचे नियमात, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून संपन्न झाला.

यावेळी देवस्थानचे सचिव अनंता कुडे व पुजारी मयुर गुरव यांचे हस्ते अभिषेक संपन्न झाला. या प्रसंगी मंदिराचे पुजारी विश्वजीत विवेक गुरव यांनी श्री पोटोबा महाराज व जोगेश्वरी माता यांची आरस करत असताना भगवान  शिवशंकर व पार्वतीमाता यांचे रूप धारण करून सुंदर सजावट केली होती.

याप्रसंगी देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, विश्वस्त किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, अॅड अशोकर ढमाले, अॅड तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाष जाधव, काकडा आरती मंडळाचे  माजी अध्यक्ष विणेकरी बबन भिलारे, विठ्ठल ढोरे, मधुकर पानसरे, पोपट चव्हाण, देवराम कुडे, हरियाली पानसरे, अनिल कोद्रे, रविंद्र तुमकर, सोमनाथ धोंगडे व पुजारी समीर गुरव आदीजन उपस्थित होते.

यावेळी भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था महाराष्ट्र लाईव्हचे पत्रकार दत्तात्रय म्हाळसकर व उद्योजक अतुल राऊत यांनी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.