Celebrity Corona Update : शाहरुख आणि कतरिना कोरोनाच्या विळख्यात; बीएमसीने दिल्या फिल्म स्टुडिओला पार्टी न करण्याच्या सूचना

एमपीसी न्यूज : अभिनेता शाहरुख खानची कोविड-19 (Celebrity Corona Update) चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कार्तिक आर्यन, कतरिना कैफ, आदित्य रॉय कपूर नंतर शाहरुखचा क्रमांक लागला आहे. यावरून कोरोना संक्रमाणाचे प्रमाण पुन्हा वाढत असल्याचे समोर आले आहे. मुंबईत कोविड-19 प्रकरणांची वाढती संख्या पाहता, बीएमसीने फिल्म स्टुडिओला के-पश्चिम वॉर्डमध्ये पार्ट्या न करण्याच्या सूचना देणारे नवीन अलर्ट जारी केले आहेत. आज महाराष्ट्रात 1 हजार 494 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 

अक्षय कुमार अलीकडेच कोविडमधून बरा झाला आहे. आज राजकीय क्षेत्रात माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना झाल्याचे जाहीर केल्यानंतर सुपरस्टार शाहरुख खानला कोरोना झाल्याचे समजले आहे. तसेच, अभिनेत्री कतरिना कैफचीही कोरोना चाचणी सकारात्मक (Celebrity Corona Update) झाल्याची बातमी आली. कतरिना पुढील  आठवड्यात विजय सेतुपतीसोबत श्रीराम राघवनच्या ‘मेरी ख्रिसमस’साठी शूटिंग सुरू करणार होती, परंतु कोविड पॉझिटिव्ह आल्याने तिला पुन्हा शेड्यूल पुढे करावे लागणार आहे. तसेच, तिचा पती विकी कौशल याला अबुधाबीमध्ये पुरस्कार मिळणार आहे. या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय तिने घेताना आपल्याला कोरोना झाल्याचे तिने जाहीर केले.

Devendra Fadnavis : राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा कोरोना

करण जोहरची पार्टी भोवली? 

25 मे रोजी करण जोहर याने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन केले होते. त्यामध्ये अनेक कलाकरांनी हजेरी लावली होती. सोशल मिडियावर बॉलीवूडमधील कोरोनाच्या चर्चेला करण जोहरच्या पार्टीचे निमित्त ठरवले जात आहे. अशा केवळ चर्चा आहेत; अथवा अफवा!

कार्तिक आणि आदित्य रॉय कपूर देखील कोविडच्या विळख्यात 

कालच, कार्तिक आर्यनने (Celebrity Corona Update) एका मजेदार कॅप्शनसह कोविडची सकारात्मक चाचणी आल्याचे घोषित केले. कार्तिकने इन्स्टाग्रामवर शेअर केले की, तो कोविड-19 साठी पॉझिटिव्ह आला आहे. त्याला विषाणूची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. त्याचा एक फोटो शेअर करत त्याने ट्विट केले आहे की, “सब कुछ इतना सकारात्मक चल रहा था, कोविड से रहा नहीं गया’. कार्तिक त्याच्या नवीन आउटिंग ‘भूल भुलैया 2’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तो आयफा 2022 समारंभात हजेरी लावणार होता.

परंतु, त्याला कार्यक्रम टाळावा लागला. यासोबतच आदित्य रॉय कपूरला देखील कोविडचे निदान झाले आहे. ज्यामुळे त्याच्या ‘ओम: द बॅटल इन’ चित्रपटाच्या प्रमोशनवर परिणाम झाला आहे. वर्कफ्रंटवर, शाहरुखने अलीकडेच चित्रपटांमध्ये परतण्याची घोषणा केली होती. ज्यात त्याचे ‘पठाण’ आणि ‘डंकी’ चित्रपट येत आहेत. यापूर्वी तो ‘जवान विथ अॅटली’ या चित्रपटाच्या फर्स्ट लूक आणि पोस्टरमुळे चर्चेत आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.