Lonavala : केंद्रीय अनुसुचित जाती जमाती कल्याण समितीची कुरवंडे गावाला भेट

एमपीसी न्यूज- केंद्र सरकारच्या अनुसुचित जाती जमाती कल्याण समितीने सोमवारी लोणावळा शहराजवळील कुरवंडे गावातील दलितवस्तीला भेट देत विकासकामांची पाहणी केली. समितीचे अध्यक्ष खासदार कीर्ती सोळंकी यांच्यासह लोकसभा व राज्यसभेचे 12 खासदार तसेच शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सोळंकी म्हणाले, ” केंद्र व राज्य सरक‍ारच्या माध्यमातून अनुसुचित जाती व जमातीच्या घटकांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्याकरिता विविध योजना आहेत मात्र या योजना त्या घटकांपर्यत योग्य प्रकारे पोहचतात की नाही यांची प‍ाहणी करून या योजनांचा लाभ योग्य प्रकारे मिळवून देण्याचे काम ही समिती करते”

समितीने झारखंड, तेलंगणा, महाराष्ट्र भागातील दलित वस्त्यांची पाहणी सुरु केली आहे. महाराष्ट्रात समिती तीन दिवस विविध भागांची पाहणी करणार आहे. या दौर्‍या दरम्यान शासनाची आयुष्यमान योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मुद्रा योजना, स्टार्ट अप इंडिया सारख्या योजनांची माहिती देण्यासोबत समाजाच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याबाबत संबंधित विभागाला सूचना देण्यात येणार असल्याचे सांगितले. कुरवंडे गावात वैद्यकिय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मोबाईल व्हॅनची सेवा सुरु करण्याबाबत सूचित केले.

यावेळी समितीचे सदस्य व खासदार रामकुमार वर्मा, वानसुख सईम, समशेरसिंग धुल्लो, अहमद हासना, अनजु बाला, फगनसिंग कुलास्ते, प्रतिमा मोंदल, कृपाल तुमने, र‍ामचंद्र पासवान, भानुप्रतापसिंग वर्मा यांच्यासह पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, समाजकल्याण आयुक्त निखिल सांबारकर, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी मांढरे, पोलीस आयुक्त संदीप प‍ाटील, प्रांत अधिकारी सुभाष भागडे, तहसीलदार रणजित देसाई, मावळचे सभापती गुलाब म्हाळसकर, कुरवंडे गावचे सरपंच रोशन ससाणे, विशाल कडू हे मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.