Petrol-Diesel Price : केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारचा दिलासा; पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त होणार 

एमपीसी न्यूज : राज्यातील ठाकरे सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रतिलिटर कपात करण्याचा निर्णय रविवारी घेतला.

दुसर्‍याच दिवशी सकारात्मक निर्णय घेत राज्यानेही सर्वसामान्यांना दिलासा दिला. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर वर्षाला सुमारे 2500 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. नवे दर कधी पासून लागू होतील हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पेट्रोल-डिझेल इतके स्वस्त झाले

केंद्र आणि राज्य सरकारने कमी केलेल्या करामुळे पेट्रोल 11 रुपये 58 पैशांनी, तर डिझेल 8 रुपये 44 पैशांनी स्वस्त झाले आहे.

पेट्रोल-डिझेलचे रविवारचे दर

दिल्ली : 96.72 ( पेट्रोल ) , 89.62 (डिझेल) प्रति लीटर
मुंबई : 111.35 ( पेट्रोल ) , 97.28 (डिझेल) प्रति लीटर
जयपुर : 108.48 ( पेट्रोल ) , 93.52 (डिझेल) प्रति लीटर
चेन्नई : 102.63 ( पेट्रोल ) , 94.24 (डिझेल) प्रति लीटर
कोलकता : 106.03 ( पेट्रोल ) , 92.72 (डिझेल) प्रति लीटर
नोएडा : 96.57 ( पेट्रोल ) , 89.96 (डिझेल) प्रति लीटर
पटना : 107.24 ( पेट्रोल ) , 94.04 (डिझेल) प्रति लीटर
लखनऊ : 96.57 ( पेट्रोल ) , 89.76 (डिझेल) प्रति लीटर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.