मंगळवार, डिसेंबर 6, 2022

New Delhi : अन्नधान्याच्या वाहतुकीला केंद्र सरकारची परवानगी

एमपीसी न्यूज :  अन्नधान्याची  वितरण व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी अन्नधान्य वितरण करणाऱ्या मालमोटारी आणि अन्य वाहनांच्या वाहतुकीला केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. आधिकृत वाहनपरवाना असलेला चालक आणि त्याला एक मदतनीस अशा दोघांना एका मालमोटारीवर काम करता येईल.

 

लॉकडाउनच्या काळात दळणवळण ठप्प झाले होते. परिणामी दुकानांमध्ये अन्नधान्याची चणचण भासत होती. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने अन्नधान्याच्या वितरणाला परवानगी दिली आहे. त्यामुळे वितरण साखळीत सुधारणा होईल.

 

मालमोटारींच्या वाहकांकडे आवश्यक ती सर्व कागदपत्र असणे गरजेचे आहे. प्रत्येक ठिकाणी या कागदपत्रांची योग्य ती पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही त्या वाहक आणि चालकांनी नियम पाळणे आवश्यक असणार आहे.

Latest news
Related news