Pimpri : केंद्र सरकारचे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी ‘आरोग्य सेतू’ ॲप लॉन्च

एमपीसी न्यूज – भारत सरकारने करोना विषाणूला रोखण्यासाठी ‘आरोग्य सेतू’ नावाचे एक मोबाइल ॲप्लिकेशन लाँच केले आहे. या ॲपच्या माध्यमातून करोना संसर्ग लोकांचे लोकेशन ट्रॅक करू शकणार आहे. तसेच सरकार या ॲपच्या माध्यमातून युजर्स रुग्णांच्या संपर्कात आहेत की नाही, याची माहिती घेवू शकतील. लोकेशन डिटेल्स आणि सोशल ग्राफच्या आधारावर आरोग्य सेतू ॲप सांगेल की, तुम्ही लो-रिस्क किंवा हाय रिस्क यापैकी कोणत्या श्रेणीत आहात. जर तुम्ही हाय रिस्कमध्ये असाल तर तुम्हाला सावधान करत टेस्ट सेंटरला भेट देण्याचा सल्लाही देईल.

आरोग्य सेतू ॲपचा वापर करण्यासाठी ब्लू टूथ आणि जीपीएसची परवानगी दिल्यानंतर तुम्हाला मोबाइल नंबर नोंदवावा लागेल. या नंबरवर येणाऱ्या ओटीपीच्या मदतीने स्वतःला व्हेरिफाय करता येईल. त्यानंतर तुम्ही नाव, वय, व्यवसायसारखी काही माहिती भरु शकता. पण ही माहिती भरणे अनिवार्य नाही. जर तुम्हाला कोरोना विषाणूशी लढण्यासाठी स्वयंसेवक व्हायचे असेल तर त्यासाठीही नाव नोंदवू शकता.आरोग्य सेतू ॲपमध्ये तुम्हाला स्व चाचणीचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. अत्यंत सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन कोरोना संक्रमणाचा धोका आहे की नाही हे जाणून घेता येईल.

जर तुमच्यात संक्रमणाशी निगडीत ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हे ॲप तुम्हाला काय करायचे आहे, याची माहिती देईल. सेल्फ आयसोलेशनबाबतही यात माहिती देण्यात आली आहे.

यामध्ये कोविड-19 च्या ट्रॅकिंग व्यतिरिक्त अन्य फिचर्सही देण्यात आले आहेत. यामध्ये संरक्षण, नजीकचे हेल्पसेंटरबाबतही माहिती देण्यात आली आहे. या ॲपवर कोविड -19 पासून आपण कसे वाचू शकतो या संदर्भात टिप्स मिळत राहते. ‘आरोग्य सेतू’ मोबाइल ॲपमध्ये एक चॅटबॉक्स आहे. जो युजर्सना या व्हायरस संदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे देतो.

हे ॲप मराठी, हिंदी, इंग्रजी सोबत इतर 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.