Pune : आता ठाकरे संपले – नारायण राणे 

उद्धव ठाकरे यांना टोला 

एमपीसी न्यूज : भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण पुणे (Pune) दौर्‍यावर असून त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अनेक प्रश्नावर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे मातोश्रीचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे नाही, अशा शब्दांत ठाकरेंवर सडकून टीका केली.

खासदार नवनीत राणा यांच्या बद्दल मातोश्रीबाहेर हिंदू शेरनी अशा आशयाचे फलक लागले आहेत.यातून ठाकरे गटाला लक्ष केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत .त्यावर नारायण राणे म्हणाले की, पुणे शहराबाबत अनेक प्रश्न आहेत. ठाकरे गट,मातोश्री एवढाच महाराष्ट्र आणि भारत आहे का असा सवाल उपस्थित केला.

Alandi : आळंदीमध्ये एम. आय. टी. तर्फे दोन दिवसीय ” कॉमर्स वीक” साजरा

 

तसेच ते पुढे म्हणाले की, ठाकरे काय राहिले आहेत.आता ठाकरे संपले अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली.तसेच उद्धव ठाकरे मातोश्रीचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे नाही, अशा शब्दांत ठाकरेंवर सडकून टीका केली. यापूर्वी ते अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. त्यावेळी ते मातोश्रीचे मुख्यमंत्री होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.