Chahal Engagement : युजवेंद्र चहल लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत
एमपीसी न्यूज – भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. यू-ट्युबर धनश्री वर्मा आणि चहलचा घरच्या घरी छोटेखानी साखरपुडा सोहळा संपन्न झाला आहे. चहलने आपल्या ट्विटर अकाऊंट वरुन ही आनंदाची बातमी दिली आहे. चहलने ही बातमी सोशल मीडियावर सांगितल्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
धनश्री वर्मा ही भारतातल्या प्रसिद्ध यू-ट्युबर पैकी एक मानली जाते. तिच्या यू-ट्युब चॅनलचे पंधरा लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अनेकांना चहल आणि धनश्री वर्माच्या या बातमीने आश्चर्याचा धक्का बसला आहे.
We said “Yes” along with our families❤️ #rokaceremony pic.twitter.com/Sf4t7bIgQt
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) August 8, 2020
भारताचा धडाकेबाज खेळाडू विरेंद्र सेहवाग याने युजवेंद्र चहल-धनश्री जोडीला त्याच्या स्टाइलमध्ये शुभेच्छा दिल्या. त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो कल्पक पद्धतीने वारपला आणि चहलला शुभेच्छा दिल्या. मोदींच्या एका भाषणात मोदी म्हणाले होते की संकटकाळातदेखील आपण सकारात्मक संधी शोधायला हव्या. मोदींचा हाच संदेश विनोदी पद्धतीने वापरत त्याने चहल-धनश्रीला शुभेच्छा दिल्या आहेत.
Waah @yuzi_chahal ! Aapda ko avsar mein badal daala. Congratulations https://t.co/qQYe0Q3iNf pic.twitter.com/J7u7tJJEDj
— Virender Sehwag (@virendersehwag) August 8, 2020