Kondhava : इसमाच्या तोंडावर मारहाण करीत सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज – कोंढव्यात एका पादचारी इसमाच्या तोंडावर मारहाण करीत त्याच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (26) सायंकाळी साढेसातच्या सुमारास येवलेवाडी येथे घडली. याप्रकरणी एका 34 वर्षीय इसमाने दिलेल्या फिर्यादीनुसार कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. 

याप्रकरणी सुशिलकुमार सिंग (वय 34, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, विशाल गोविंद वार (वय 27), उमेश महादेव कानकुडे (वय 21), अक्षय प्रकाश पालकर, (वय 21,तिघेही रा. आंबेगाव पठार), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सुशिलकुमार हे शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पान खाण्यासाठी पायी जात असताना कमानीच्या शेजारी उभी असलेली एक काळ्या रंगाची ऑटो रिक्षामध्ये तीनजण बसले होते. त्यांपैकी एकाने सुशिलकुमार यांचा डावा हात ओढून त्यांना हातातील कड्याने तोंडावर मारून जखमी केले. आणि त्यांच्या गळ्यातील 35 हजार रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान, सुशिलकुमार यांच्या फिर्यादीनुसार विशाल, उमेश आणि अक्षय या तिघांना अटक करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे हे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.