Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे अज्ञात चोरट्यांनी मंगळसूत्र चोरले

एमपीसी न्यूज : अज्ञात चोरट्याने एका महिलेचे 60,000 रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना तळेगाव दाभाडे शहरात 6 डिसेंबर रोजी घडली आहे.(Talegaon Dabhade) याबाबत पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

स्पोर्ट्स बाईक वरील दोन इसम अंदाजे 20 ते 25 वर्ष (नाव पत्ता माहित नाही) या आरोपींच्या विरोधात भा.द.वि  कलम 392, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chikhali News : चिखलीत मोटरसायकल वरून आलेल्या चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावले

फिर्यादी या 6 डिसेंबरला रात्री 8.15 वा यशश्री क्लासेसच्या  समोर, मारुती मंदिर चौकाजवळ, तळेगाव दाभाडे इथून जात असताना आरोपी यांनी स्पोर्ट्स बाईकवरून येऊन फिर्यादी (Talegaon Dabhade) यांच्या गळ्यातील  60,000 रुपये किंमतीचे 20 ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून मारुती मंदिर चौका मार्गे लिंब फाट्याकडे पळून गेले आहेत. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.