Bhosari : पादचारी महिलेचे मंगळसुत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – पायी चालत जाणाऱ्या महिलेचे दिड तोळ्याचे मंगळसूत्र दोन चोरट्यांनी हिसकावून नेले आहे. ही घटना सोमवारी (दि. 8) प्रगती हार्मनी, संतनगर येथे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

आशा चंद्रशेखर चल्लापल्ली (वय 23, रा. संतनगर, मोशी) यांनी भोसरी पोलीस ठाण्याद फिर्याद दिली. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा या त्यांच्या मुलाला घेऊन घरी पायी चालत जात होत्या. त्या प्रगती हार्मनी, संतनगर येथे आल्या असता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील 45 हजार किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.