Pune : दुचाकीवरील चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – भरधाव दुचाकीवरून येत चोरट्यांनी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना सूसरोड पाषाण येथे काल गुरुवारी (दि.16) रात्री नऊच्या सुमारास घडली.

याप्रकरणी एका 48 वर्षीय महिलेने चतुःश्रूंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोटारसायकलवरील दोन अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या पाषाण येथील साई चौकाजवळील बसस्टॉप जवळून भाजी घेऊन घरी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून भरधाव येत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे 75 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून चोरून नेले.

पोलीस उप निरीक्षक अनुराधा भोसले या अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.