Moshi : रस्त्यावर थांबलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी रस्त्यावर थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील 60 हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना मोशी येथे शुक्रवारी (दि. 24)सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडला.

याप्रकरणी किरण भारत सस्ते (वय 25, रा. टायगर गुहा, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार (एमएच-14, जीटी 9044) या क्रमाकांच्या दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सस्ते या शुक्रवारी सकाळी नाशिक महामार्गावर रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या. दुचाकीवरून आलेल्या आरोपीने त्यांच्या गळ्यातील 60 हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. भोसरी, एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.