Pune News : चैन स्नॅचिंग, वाहन चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांना अटक ; सोनारही ताब्यात

Chain snatching, vehicle theft criminals arrested; Gold smith is also in possession

एमपीसी न्यूज – चैन स्नॅचिंग, वाहन चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तसेच, गुन्ह्यातील चोरीचे सोने खरेदी करणा-या सोनारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट पाचने शनिवारी (दि.5) ही कारवाई केली. 

दिपक परशुराम माळी (वय 22, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे), मुकेश सुनिल सांळुखे (वय 19, रा. खरडकरवस्ती, मुंढवा, पुणे) सोनार सम्राट हुकूमसिंग भाटी याला देखील या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

अटक आरोपीकडून 57 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व तीन मोटार सायकल असा एकूण चार लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी दिपक माळी व मुकेश साळुंखे यांच्यावर 16 चेनचोरीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिपक माळी व मुकेश सांळुखे हडपसर येथील रविदर्शन, पुणे सोलापुर रोड याठिकाणी येणार असल्याची माहिती युनिट पाचच्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. आरोपींनी पुणे शहरात चतुःश्रृंगी व येरवडा पोलीस ठाणे परिसरात चोरीच्या गाडयावर व स्वतःच्या गाडयांचा वापर करुन चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले.

त्यांच्याकडून चार चेन स्नॅचिंगचे व एक वाहन चोरी असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी गुन्हा केल्यानंतर ओळखीचा सोनार सम्राट भाटी याला विकत असल्याचे निष्पन्न झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.