Pune : ‘चैत्र पालवी’ कार्यक्रमाने नव वर्षाची संगीत,नृत्यमय सुरुवात

एमपीसी न्यूज – ‘कलावर्धिनी’ संस्था आणि इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनस् (आयसीसीआर) यांच्या वतीने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘चैत्रपालवी’ कार्यक्रमाचे (Pune) आयोजन करण्यात आले होते. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार, मार्च 22 रोजी सायंकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम पार पडला.

 

निशी बाला,शारंगधर साठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.अनुप्रिता लेले , रेवती देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. चैत्र महिन्याचे आगमन या दिवशी होत असल्याचे औचित्य साधून हा सांस्कृतिक कार्यक्रम आखण्यात आला होता. नृत्य गुरु मनीषा साठे(कथक),आणि मंजिरी आलेगावकर (शास्त्रीय गायन) यांचा सहभाग या कार्य्रक्रमात होता. भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.(Pune) हा कार्यक्रम विनामूल्य होता. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा 155 वा कार्यक्रम होता.

 

 

Corona : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची आढावा बैठक

 

मंजिरी आलेगावकर यांनी सुरुवातीला राग श्री गायला. ‘तुम हो आधार’ तराणा सादर केला. ‘ अर्धांगी गिरिजा गौरी ‘ हा तराणा नजाकतीने सादर केला. ‘ संत कबीर यांचे निर्गुणी भजन देखील त्यांनी सादर केले आणि उपस्थितांची मने जिंकली.

 

 

प्रभू श्रीराम यांचे गुणवर्णन करणारी नृत्य प्रस्तुती मनीषा साठे यांनी केली आणि उपस्थित भारावून गेले ‘आडा चौताल ‘ हा तालही त्यांनी त्यांच्या सहकारी शिष्यांसमवेत सादर केला. (Pune) ‘मोहे छेडो ना नंद ‘ ही ठुमरी मनिषा साठे यांनी सादर करून पाडव्याची सायंकाळ तरल केली. त्यांच्या नाती सर्वेश्वरी साठे,आलापी जोग यांनीही ‘ जय जय शिवशंकर ‘ ही नृत्यप्रस्तुति केली.स्वरगुंजन सांगितिक रचनाही सादर करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.