Vadgaon Maval News : वडगांव मावळ ची चैत्र पौर्णिमा यात्रा रद्द

शासनाचे नियम पाळून फक्त धार्मिक विधी होणार

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील असंख्य भाविक,भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांचा उत्सव चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती या दिवशी होत असतो.

परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान संस्थानची बैठक आयोजित करण्यात आली होती, यामध्ये मंगळवारी २७ एप्रिल रोजी यात्रेच्या दिवशी पहाटे ४ वाजता फक्त अभिषेक, आरती  व ६:३० वाजता हनुमान मंदिर या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव सोहळा होणार आहे. आणि नंतर ७ ते ७:३० वाजता गुरववाडा ते श्री पोटोबा मंदिर पालखी प्रदक्षिणा असे धार्मिक कार्यक्रम शासनाचे नियमात संपन्न होणार आहे अशी माहिती देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांनी दिली.

यावेळी देवस्थान चे उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे,विश्वस्त सचिव अनंता कुडे,विश्वस्त किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे,अॅड अशोक ढमाले, अॅड तुकाराम काटे,अरुण चव्हाण,तुकाराम ढोरे, सुभाष जाधव आदीजन उपस्थित होते.

यात्रेच्या दिवशी भाविकांनी घरी बसुनच ऑनलाईन दर्शन घ्यावे असे आवाहन यावेळी विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.