Chakan : महाळुंगेमध्ये आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडी

एमपीसी न्यूज- जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा महाळुंगे येथे पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. आषाढी एकादशी निमित्त शाळेत बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

या दिंडीत सर्व विद्यार्थी वारकऱ्यांची वेशभूषा करून दिंडीमध्ये ज्ञानोबा ,तुकाराम जयघोष करीत सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर केला. शाळेपासून श्रीपतीबाबा महाराजांच्या मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली होती. मुली नऊवारी साडी नेसून, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन तर मुलं सदरा धोतर घालून, खांद्यावर पताका घेऊन झांजा वाजवत, झिम्मा फुगडी खेळत, हातात टाळ व भगवे ध्वज व मुखातून ज्ञानोबा माऊली तुकाराम, ग्यानबा तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जयचा जयघोष करीत गावातून निघालेल्या दिंडीने महाळुंगेकर नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

या दिंडीमध्ये मुख्याध्यापक, सर्व शिक्षक,पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक भालचिम व सर्व शिक्षकयांनी बालदिंडीचे उत्कृष्ट नियोजन केले होते.

HB_POST_END_FTR-A2
You might also like