Chakan: आरडाओरडा करण्याचा जाब विचारल्यावरून तरुणीला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – घरासमोर आरडाओरडा करणा-यांना जाब विचारल्याच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एका तरुणीला हाताने व दगडाने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 12) रात्री आठ वाजता खंडोबामाळ, चाकण येथे घडली.

मधुदेवी सुधीरकुमार कुसुवाह (वय 22, रा. खंडोबामाळ, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बिलाल अली शेख, बिलाल याची आई आणि बहीण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुसुवाह यांच्या घराच्या शेजारी राहणारे आरोपी फिर्यादी यांच्या घरासमोर आरडाओरडा करीत होते. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपींना ‘आरडाओरडा का करता’ असे विचारले. यावरून आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना हाताने व दगडाने मारहाण करून जखमी केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.