Chakan : शेतातील भातपीक कापून नेल्याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – शेतातील भातपीक शेतक-याच्या परवानगीशिवाय कापून नेल्याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार खेड तालुक्यातील शिंदे गावात घडला आहे.

शिवाजी लक्ष्मण माताळे, विष्णू सुदाम माताळे, रामदास किसन माताळे, तानाजी बाजीराव माताळे, नरहरी लक्ष्मण माताळे, उल्हास विष्णू माताळे, कलाबाई बाळू पानमंद, स्वाती राजू माताळे, वंदना तानाजी माताळे, सखुबाई गोरक्षानाथ माताळे, नवनाथ शिवाजी माताळे (सर्व रा. शिंदे, पो. वासुली, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी भानुदास ज्ञानोब माताळे (वय 46) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भानुदास यांनी त्यांच्या हिस्स्याच्या शेतात इंद्रायणी वाणाच्या भात पिकाची लागवड केली होती. ते 60 हजार रुपये किमतीचे भातपीक आरोपींनी विळ्याने कापून नेले. तसेच आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1