Chakan : चाकणला 21 हजार 500 पिशवी कांद्याची आवक; भावात अपेक्षित सुधारणा नाही

एमपीसी न्यूज : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Chakan) चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी (दि. 28 जानेवारी) कांद्याची 10 हजार 750 क्विंटल म्हणजेच 21 हजार 500 पिशवी आवक होऊन कांद्याला प्रतीक्विंटलला 1 हजार ते 1  हजार 600 रुपये भाव मिळाला. कांद्याला सरासरी 1200 ते 1400 रुपये भाव मिळत आहे.

जुना कांदा संपला असताना नवीन कांद्याच्या भावात स्थानिक बाजारपेठेतील भावात मोठी सुधारणा होत नसल्याची स्थिती समोर येत आहे. याबाबत चाकण मार्केटमधील काही निर्यातदार कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले कि, दक्षिण पूर्व आशियातील बाजारपेठांना सुट्टी असल्याने निर्यातीवर मर्यादा आल्याने भावात अपेक्षित वाढ झाली नाही. लासलगावमध्ये नवीन वर्षात 1 हजार 451 रुपये भाव मिळाला होता. त्यानंतर हा भाव 1300 ते 1500 रुपयांवर स्थिरावला आहे.

देशातंर्गत कांदा बिहार, ओडीसा, आगारतळा, मिझोरम, त्रिपुराकडे विक्रीसाठी रेल्वेने रवाना होत आहे. मलेशिया, सिंगापूर, फिलीपाइन्स, व्हिएतनामच्या बाजारपेठांना सुट्टी मिळण्यापूर्वी तेथील आयातदारांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करून ठेवली आहे.

दरम्यान, चाकण मार्केटमध्ये पुढील काळात खूप मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होणार (Chakan) असून केंद्र शासनाने निर्यातीस प्रोत्साहन देणारे धोरण ठरवण्याची मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, पुणे जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते निलेश कड, चाकण विकास मंचचे अध्यक्ष कुमार गोरे, चाकण अडते असो.चे जमीर काझी, माणिक गोरे, राम गोरे आदींसह शेतकरी आणि निर्यातदार कंपन्यांनी केली आहे.

Chinchwad : बावधन व चिंचवडमधून दुचाकी चोरीला

बटाट्याचे भाव स्थिर :

चाकण मार्केटमध्ये बटाट्याची 1 हजार 750 क्विंटल आवक होऊन 1 हजार ते 1 हजार 400 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनकडून देण्यात आली. बटाट्याचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिर असल्याचे अडत्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.