BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : कंपनीतील साडेतीन लाखांचा मालाची चोरी

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – अल्पाटेक इंजिनिअर कंपनीमधील स्टील प्लेट, स्टील पाईप, कॉपरपट्टी, वेल्डिंग वायर असे एकूण 3 लाख 55 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. ५) सकाळी सातच्या सुमारास भांबोवी चाकण येथे घडली.

याप्रकरणी नीरज प्रेमसपख चंगेडिया (वय 40, रा. पिंपळे सौदागर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नीरज यांची भांबोवी चाकण येथे अल्पाटेक इंजिनिअर ही कंपनी आहे. सोमवारी (दि. 4) रात्री अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या कंपनीमध्ये प्रवेश केला. कंपनीतील स्टील प्लेट, स्टील पाईप, कॉपरपट्टी, वेल्डिंग वायर असा एकूण 3 लाख 55 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले.

मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरिक्षक मणेर अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.