BNR-HDR-TOP-Mobile

Chakan: संत निरंकारी चॅरिटेबलच्या शिबिराचा 39२ जणांनी केले रक्तदान

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या वतीने चाकण येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात 392 जणांनी सहभाग घेताल. ससून रुग्णालय रक्तपेढी(२१५ युनिट), यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी यांनी (१७७ युनिट) रक्त संकलन केले. “रक्तदान करूया आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवूया” हि सामाजिक भावना उराशी बाळगून ३९२ जणांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन “ताराचंद करमचंदानी यांच्या हस्ते आणि अंगद जाधव यांच्या उपस्थितीत झाले. या शिबिरादरम्यान खेड तालुक्याचे आमदार सुरेश गोरे, आळंदी विधानसभेचे माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील, चाकण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष, प्रकाश गोरे, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते. “रक्तदान करणे हे कार्य मोलाचे आहे, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असे मत सुरेश गोरे यांनी केले.

  • सदिच्छा भेटी दरम्यान दिलीप मोहिते पाटील म्हणाले, “संत निरंकारी मिशन हे एक आध्यात्मिक मिशन आहे त्याचप्रमाणे हे मिशन समाजामध्ये स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर यांसारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहेत, या कार्यातून माणुसकीचे साक्षात दर्शन होते. तसेच समाजातील अनेक विखुरलेले परिवार संत निरंकारी मिशनमध्ये येऊन एकोप्याने राहताना मी पाहिले आहे.

यावेळी परिसरातून आलेल्या रक्तदात्यासाठी भव्य प्रदर्शनी मार्फत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे कार्याबाबत माहिती दिली. तसेच संपूर्ण चाकण परिसरात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवक-सेवादल यानी लेझीम पथक, पथनाटिका, बाईक रॅली, प्रभात फेरी द्वारे रक्तदानविषयी जनजगृती केली. यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढीच्या डॉ. नीता घाडगे तसेच ससून रक्तपेढीचे डॉ.स्वामी महाबळेश्वर यांच्या डॉक्टर्सच्या समूहाने आपली सेवा अर्पण केली. प्रास्ताविक बाबासाहेब कमाले यांनी केले. मधुकर गोसावी यांनी आभार मानले.

HB_POST_END_FTR-A4

.