BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : म्हाळुंगे येथे 43 किलो गांजा जप्त; म्हाळुंगे पोलीस आणि अमली पदार्थ विरोधी पथकाची संयुक्त कारवाई

एमपीसी न्यूज – चाकणजवळ म्हाळुंगे येथे म्हाळुंगे पोलीस व अमली पदार्थ विरोधी पथक यांनी संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाईमध्ये 43 किलो वजनाचा सहा लाख 45 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला.

सुरेश मारुती पवार (वय 52, रा. धानोरा, जामखेड, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक भानुदास जाधव आणि अमली पदार्थविरोधी पथकाचे प्रमुख श्रीराम पौळ म्हाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी एक इसम गांजा घेऊन जात असल्याची माहिती त्यांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत सुरेश पवार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी 43 किलो वजनाचा सहा लाख 45 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. सुरेश पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3