Chakan Police : दरोडयाप्रकरणी 5 जणांना चाकण पोलिसांनी केली अटक

एमपीसी न्यूज : पोलिसांनी 5 जणांना दरोडा (Chakan Police ) घातल्याबद्दल 18 जून रोजी अटक केली आहे. नवनाथ राऊत (वय 50 वर्षे, रा. दत्तवाडी जवळ शेळगाव, तालुका खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी आकाश जाधव (वय 32 वर्षे व ज्ञानेश्वर पवार रा. शिक्रापूर, तालुका शिरूर), हसूरज चौगुले (वय 18 वर्षे) व महेश मंगळवेढाकर (वय 18 वर्षे, रा. मंचर, तालुका आंबेगाव) व मंचरमधील राहणारा एक विधिसंघर्षित बालक यांना अटक करण्यात आले आहे.

Bhosari Murder Case : भोसरीत धारदार शस्त्राने तरुणाचा खून, दोनजण अटकेत

आरोपींनी 18 जून रोजी पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरावर दरोडा टाकला. ओळख पटू नये म्हणून त्यांनी चेहरा लपविण्यासाठी मास्क घातला होता. तसेच, लोखंडी कोयता, एक्सा पान, कटावणी व मिरची पावडर, कटर स्क्रू ड्राइवर, चिकट टेप अशी हत्यारे जवळ बाळगून आकाश जाधव याने फिर्यादी नवनाथ राऊत यांचा कामगार बिसवास याला कोयत्याचा धाक दाखवून कॉलर पकडली, तर हसूरज चौगुले याने जबरदस्तीने रणजीतच्या खिशातील 2,000 रुपये काढून घेतले. याबाबत पाचही आरोपींविरोधात भा. द. वि. कलम 395, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात (Chakan Police) आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.