BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : ६५ हजार पिशवी कांद्याची आवक; भाव स्थिर, क्विंटलला ४०० ते ७०० रुपये भाव

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डात कांद्याची भरघोस आवक सुरु असून बुधवारी (दि.१३) तब्बल ६५ हजार पिशवी कांद्याची आवक झाली.

मागील बुधवारच्या तुलनेत ही आवक सहा हजार पिशव्यांनी घटली मात्र, कांद्याचे भाव स्थिर राहिले. कांद्याला प्रतवारीनुसार ४०० ते ६५० रुपये दर मिळाला. काही लिलावांत कांद्याला ७०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. बुधवारी चाकण मार्केट मध्ये २९० वाहनांतून ६५ हजार पिशव्यांची आवक झाली.

  • चाकण उपबाजारात एक नंबरच्या ठरावीक कांद्याला ७०० रूपये क्विंटलचा भाव मिळाला, कमी प्रतीच्या कांद्याला ४०० तर सरासरी ६०० रुपये क्विंटल दराने कांद्याची विक्री झाल्याचे शेतकरी व व्यापाऱ्यांनी सांगितले.
HB_POST_END_FTR-A2

.