Chakan: बँकेत घुसून कर्मचाऱ्याला नातेवाईकांकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – बँकेत काम करत असलेल्या एकाला बँकेत येऊन मारहाण केली. तसेच कारमधून घेऊन जाऊन आणखी मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 30) सकाळी अकरा वाजता चाकण येथील शरद सहकारी बँकेच्या शाखेत घडली.

ज्ञानेश्वर मारुती हांडे (वय 51, रा. पारगाव तर्फे खेड, ता. आंबेगाव) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार काळूराम रमेश पोतले, रमेश आनंद पोतले, जावयाची मामी गुजाळ (पूर्ण नाव माहिती नाही), अर्चना (पूर्ण नाव माहिती नाही), तुळसाबाई रमेश पोतले, सोन्या रमेश पोतले (सर्व रा. मोहितेवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी हांडे यांच्या मुलीच्या सासरकडील पाहुणे आहेत. हांडे चाकण येथील शरद सहकारी बँकेत नोकरी करतात. गुरुवारी सकाळी आरोपी शरद सहकारी बँकेत आले. त्यांनी हांडे यांना हाताने व हेल्मेटने मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने कारमध्ये बसून मोहितेवाडी येथे नेले. तिथे नेल्यावर हांडे यांना सर्व आरोपींनी शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.