BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : सार्वजनिक रस्त्यावरून जाणा-या चुलत्या-पुतण्याला फावड्याने मारहाण

एमपीसी न्यूज – सार्वजनिक रस्त्याने जात असलेल्या चुलत्या-पुतण्याला अडवून चौघांनी मिळून फावड्याने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 10) दुपारी चारच्या सुमारास खेड तालुक्यातील कुरकुंडी येथे घडली.

देविदास रोहिदास भोकसे (वय 22, रा. कुरकुंडी, ता. खेड), हरिभाऊ मोहन भोकसे (वय 47) अशी जखमी चुलता-पुतण्याची नावे आहेत.

  • याप्रकरणी देविदास यांनी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार अनिकेत आनंदा भोकसे (वय 22), कमलेश कैलास भोकसे (वय 35), शुभम अनिल भोकसे (वय 19), कैलास जयवंत भोकसे (वय 45) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देविदास आणि त्यांचे चुलते हरिभाऊ शनिवारी दुपारी चारच्या सुमारास कुरकुंडी येथे सुरु असलेल्या सार्वजनिक रोडचे काम पाहत होते. त्यावेळी पाहणी करत असेलला रस्ता आरोपींच्या जमिनीतून जात असल्याचा राग मनात धरून आरोपींनी देविदास आणि हरिभाऊ यांना दगड आणि फावड्याने मारहाण केली. यामध्ये दोघेही जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3