Chakan : शेतात काम करणाऱ्या महिलेशी गैरवर्तन केल्या प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – शेतात काम करणाऱ्या महिलेशी (Chakan) गैरवर्तन करणाऱ्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.30) दौडकरवस्ती येथे घडली आहे.

याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिली असून सोपान ज्ञानेश्वर गुजर (वय 32 रा. पिंपळगाव, खेड) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Maval : निगडे येथील तलाठी कार्यालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी या दुसऱ्याच्या शेतात बाजरी काढण्याचे काम करत असताना आरोपीने त्यांना पाठीमागून मिठी मारत त्यांच्याशी गैरवर्तन केले. मात्र यावेळी फिर्यादीच्या हातात विळा होता.

त्याचा धाक दाखवताच आरोपी घाबरून तिथून निघून गेला. त्याने याप्रकऱणी कोणाला सांगितले तर बघून घेईन अशी धमकी दिली. यावरून चाकण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस पुढील तपास करत (Chakan) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.