Chakan: मुलींना जाळ्यात ओढून फसवणारा गजाआड; महाळुंगे पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – मॅट्रीमोनीअल साईट वरून सधन कुटुंबातील मुलींना प्रेमाच्या (Chakan)जाळ्यात ओढून त्यांना लग्नाचे व मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष  दाखवत पैसे उकळून फसवणूक करणाऱ्या ठगास महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.  अभिषेक अशोक खालकर ( वय 29 वर्ष, रा. भोसरी )  असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

चाकण एमआयडीसीतील महिंद्रा कंपनी येथे आपली चांगली (Chakan)ओळख आहे असे भासवून त्याने एका तरुणी कडून दहा लाख 41 हजार पाचशे रुपये आपल्या बँक खात्यावर घेतले होते. महिंद्रा कंपनीचे बनावट अपॉइंटमेंट लेटर पाठवून फिर्यादी तसेच त्यांचे नातेवाईक व इतर मित्र यांची फसवणूक केली होती. यावरून महाळुंगे पोलीस ठाण्यात अभिषेक खालकर याच्यावर गुन्हा दाखल होता.

Pimpri : राष्ट्रीय गांधी शिल्प बाजारच्या वतीने पिंपरीत हस्तकला आणि हातमाग प्रदर्शन

पोलिसांनी त्याला भोसरी येथून अटक केली आहे.  तो वेगवेगळ्या नावाने व्हाट्सअप वरून अनेकांशी संपर्क करून रक्कम घेऊन फसवणूक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून गुन्हात वापरलेले दोन मोबाईल फोन , सोन्याच्या दोन अंगठ्या , एक टीव्हीएस मोटरसायकल असा एकूण एक लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीने आणखी महिलांशी अशा प्रकारे फसवणूक केलेली असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन महाळुंगे एमआयडीसी पोलीस यांनी केली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.