Chakan : पावणेतीन लाखांची सोनसाखळी हिसकावली

A gold chain worth Rs 53 lakh was snatched

एमपीसी न्यूज – भांडणाच्या कारणावरून एका टोळक्याने घरावर दगडफेक करून घरावर लाथा मारल्या. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एकाला दमदाटी आणि शिवीगाळ करत 2 लाख 70 हजार रुपये किमतीची नऊ तोळ्याची सोन्याची साखळी जबरदस्तीने चोरून नेली.

रविवारी (दि. 24) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास चाकण मधील रानुबाईमळा येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी दत्तात्रय किसन बिरदवडे (वय 49, रा. रानुबाईमळा, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी प्रतीक जयनाथ लेंडघर, आकाश दत्तात्रय लेंडघर, सुधाकर दत्तात्रय लेंडघर, संकेत बाजीराव लेंडघर, प्रथमेश दौंडकर (सर्व रा. रानुबाईमळा, चाकण) आणि त्यांचे सात ते आठ साथीदार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचे मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. आरोपी प्रतीक, आकाश आणि सुधाकर यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या अन्य साथीदारांना घेऊन येऊन फिर्यादी यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच त्यांच्या घराच्या दरवाजावर लाथा मारल्या.

याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी आरोपींकडे गेले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना धक्काबुक्की आणि दमदाटी करत शिवीगाळ केली. तसेच एका आरोपीने फिर्यादी यांच्या गळ्यातील 2 लाख 70 हजार रुपये किमतीची 9 तोळे वजनाची सोन्याची साखळी जबरदस्तीने चोरून नेली.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like