Chakan : कंपनीमधून सव्वा लाखांचे साहित्य चोरीला

A quarter of a lakh of material was stolen from the company

एमपीसी न्यूज – कंपनीच्या ओपन शेडमध्ये ठेवलेले एक लाख 20 हजारांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना 24 जून रोजी सकाळी म्हाळुंगे येथील मेटालिक्स क्रायोजेनिक लिमिटेड कंपनीत उघडकीस आली.

अनिरुद्ध अनिल बेलन (वय 25, रा. आंबेठाण रोड, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे येथील मेटालिक्स क्रायोजेनिक लिमिटेड कंपनीत फिर्यादी बेलन नोकरी करतात. त्यांच्या कंपनीच्या ओपन शेडमध्ये एक लाख 20 हजार रुपयांचे 438 सर्कल नग ठेवले होते.

23 जून सायंकाळी साडेसहा ते 24 जून सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत हे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.