Chakan : हिटरचा शॉक लागून शाळकरी मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अंघोळ करण्यासाठी गेलेल्या चौदा वर्षीय शाळकरी मुलाचा हिटरचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 15) सकाळी सांगुडी येथे घडली.

उत्कर्ष सुधीर भसे (वय 14, रा. सांगुडी, ता .खेड) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत उत्कर्ष देहू येथील जगद्गुरु इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेत सातवीमध्ये शिकत होता. रविवारी शाळेला सुट्टी असल्याने तो उशिरा उठला. झोपेतून उठल्यानंतर तो अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. अंघोळीला पाणी गरम करण्यासाठी त्याने हिटर सुरु केला. हिटर सुरु झाल्यानंतर त्याचा हात चुकीने हिटरला लागला. त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि उत्कर्ष बाथरूममध्येच कोसळला.

घरच्यांनी उत्कर्ष बाथरूममध्ये पडल्याचे पाहिले आणि त्याला तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1