Chakan : भरधाव रिक्षाची दुचाकीला धडक; एक जण जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव रिक्षाने दुचाकीला समोरून जोरात धडक (Chakan)दिली. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 3) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास चाकण येथे घडली.

ज्ञानेश्वर भगवान होळकर (वय 38, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thergaon : पीजी होस्टेल मधून तीन लॅपटॉप, दोन मोबाईल चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी होळकर (Chakan)आणि त्यांचा मित्र सोमनाथ सुरवसे हे पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावरून जात होते. त्यावेळी त्यांच्या समोरून भरधाव वेगात एक रिक्षा आली. रिक्षा चालकाने भरधाव वेगात रिक्षा चालवून होळकर यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये होळकर हे जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.