Chakan : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये एकूण 6 कोटी, 3० लाखांची उलाढाल

कांद्याच्या आवकमध्ये वाढ; भावात घसरण

एमपीसी न्यूज :   खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये  काल (दि. 7) रोजी कांद्याची आवक वाढून भावात घसरण झाली आहे. गाजरासह हिरवी मिरची व बटाट्याचे भाव कडाडले आहेत.तोतापुरी कैऱ्यांची मोठी आवक झाली. लसणाची आवक घटूनही भाव स्थिर राहिले. काकडी, वाटाणा व गाजराची भरपूर आवक होऊन भावात वाढ झाली.

 

पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, पालक, कोथिंबीर व शेपू यांच्या भावात मोठी वाढ झाली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल व शेळ्या – मेंढ्यांच्या संख्येत वाढ होऊन भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल 6 कोटी, 3० लाख रुपये झाली.

Operation Nanhe Farishte : ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत वर्षभरात 1064 भरकटलेल्या मुलांची सुटका

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 12 हजार क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 25०० क्विंटलने वाढल्याने भावात 3०० रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव 2००० रुपयांवरून 17०० रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 15०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून भावात 2०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव 23०० रुपयांवरून 25०० रुपयांवर पोहोचला.

 

बंदूक भूईमुग शेंगा व जळगाव भुईमुग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक 3० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 2 क्विंटलने घटून लसणाचा कमाल भाव 12 हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 325 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 15 क्विंटलने वाढून भावात वाढ झाली. हिरव्या मिरचीला 5 हजार रुपयांपासून ते 6 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

 

फोटो – चाकण बाजारात कांदा व काकडीची झालेली आवक.
     
शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे –
कांदा – एकूण आवक – 12,००० क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,7०० रुपये, भाव क्रमांक 2. 15०० रुपये, भाव क्रमांक 3. 12०० रुपये.
बटाटा – एकूण आवक – 15०० क्विंटल. भाव क्रमांक 1. 25०० रुपये, भाव क्रमांक 2. 2,००० रुपये, भाव क्रमांक ३. 18०० रुपये.

 

फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे –
टोमॅटो – 294 क्विंटल ( 8०० ते 12०० रू. ), कोबी – 205 क्विंटल ( 1००० ते 12०० रू.), फ्लॉवर – 23० क्विंटल ( 6०० ते 9०० रु.), वांगी – 68 क्विंटल ( 2००० ते 3००० रु.), भेंडी – 9० क्विंटल ( 2००० ते 3००० रु.), दोडका – 6० क्विंटल ( 25०० ते 35०० रु.), कारली – 62 क्विंटल ( 3००० ते 4००० रु.), दुधीभोपळा – 8० क्विंटल ( 1००० ते 2००० रु.), काकडी – 9० क्विंटल ( 5०० ते 15०० रु.), फरशी – 59 क्विंटल ( 3००० ते 4००० रु.), वालवड – 57 क्विंटल ( 3००० ते 5००० रुपये), गवार – 60 क्विंटल ( 4००० ते 6००० रुपये, ), ढोबळी मिरची – 16० क्विंटल ( 4००० ते 6००० रु.), चवळी – 36 क्विंटल ( 4,००० ते 6,००० रु.), वाटाणा – 158 क्विंटल ( 6,००० ते 7,००० रु.), शेवगा – 5० क्विंटल ( 1,००० ते 2,००० रु.), गाजर – 13० क्विंटल ( १,5०० ते 2,००० रु.),.

 

पालेभाज्या – चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे –
मेथी – एकूण 18 हजार 5०० जुड्या ( 1,००० ते 12०० रुपये,), कोथिंबीर – एकूण 28 हजार 9०० जुड्या (6०० ते 9०० रुपये,), शेपू – एकूण 4  हजार 1०० जुड्या ( 5०० ते 1,००० रुपये ), पालक – एकूण 4 हजार 35० जुड्या ( 5०० ते 7०० रुपये)

 

जनावरे –
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 37 जर्शी गाईपैकी 3० गाईची विक्री झाली. ( 1०,००० ते 4०,००० रु.), 85 बैलांपैकी 65 बैलांची विक्री झाली. (1०,००० ते 4०,००० रु.), 11० म्हशीपैकी 9० म्हशींची विक्री झाली.( 2०,००० ते 8०,००० रु.), 11 हजार 84० शेळ्या – मेंढ्यापैकी 116०० शेळ्यांची विक्री झाली. (2००० ते 15००० रु.)


MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.