_MPC_DIR_MPU_III

Chakan : सतर्क कामगारामुळे कंपनीच्या गोडाऊनमध्ये चोरीचा प्रयत्न फसला

एमपीसी न्यूज – कंपनीच्या गोडाऊनमध्ये चोरी करताना सतर्क कामगाराने चोरट्यांना हटकले. चोरटे असल्याचा सुगावा लागताच कामगाराने एका चोरट्याला पकडून ठेवले. मात्र, चोरीचा प्रयत्न फसताच चोरट्यांनी गोडाऊनमधून पळ काढला. ही घटना रविवारी (दि. 8) पहाटे दीडच्या सुमारास खराबवाडी येथील स्वराज इंडस्ट्रीज कंपनीच्या गोडाऊनमध्ये घडली.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

गजानन आनंदराव सूर्यवंशी (वय 26, रा. खराबवाडी, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराबवाडी चाकण येथे स्वराज इंडस्ट्रीज ही कंपनी आहे. रविवारी रात्री पहाटे दीडच्या सुमारास तीन अनोळखी चोरटे रिक्षातून (एमएच 14 / एचएम 1104) आले. गोडाऊनचे शटर उचकटून आत प्रवेश केला. चोरटे कंपनीत आले असल्याचे कुणकुण गजानन यांना लागली. त्यांनी तत्परतेने तीन चोरट्यांपैकी एकाला पकडून ठेवले. मात्र, चोरट्याने धक्का देऊन कंपनीतून पळ काढला. चोरटे त्यांनी आणलेला रिक्षा जागेवर सोडून पळून गेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.