Chakan : दुकानाचे शटर जोरजोरात वाजवणाऱ्यास जाब विचारल्याने तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज – दुकानाचे शटर जोरजोरात वाजवणाऱ्या एकाला तरुणाने जाब विचारला. या कारणावरून शटर वाजवणाऱ्याने तरुणाला लोखंडी पाईपने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 5) आंबेठाण चौक, चाकण येथे घडली.

किरण सुधीर महाजन (वय 28, रा. आंबेठाण चौक, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन पिंगळे (रा. आंबेठाण चौक, चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या मित्राच्या दुकानात शटर बंद करून पार्टी करीत बसले होते. त्यावेळी आरोपी तिथे आला. त्याने मी सचिन पिंगळे आहे असे म्हणत दुकानाचे शटर जोरजोरात वाजवले. त्यावेळी किरण यांनी शटर उघडले आणि सचिनला शटर वाजविण्याचा जाब विचारला. त्याचा राग मनात धरून सचिन याने किरण यांना शिवीगाळ केली.

दोघांची बाचाबाची होऊन आरोपीने किरण यांच्या डोळ्यावर लोखंडी पाईपने मारून जखमी केले. त्यावेळी किरण यांच्या मित्रांनी भांडणे सोडवली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.