Chakan : गाडीला कट मारला म्हणून तरुणाला बेदम मारहाण; गाडीची व घराची तोडफोड, तिघांना अटक

एमपीसी न्यूज – गाडी चालवत असताना गाडीचा कट लागला या किरकोळ कारणावरून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने घरात घुसून एका तरुणाला कोयत्याने मारहाण करत जखमी केले आहे . आरोपी यावर थांबले नाही तर त्यांनी तरुणाच्या गाडी व घराची तोडफोड करत परिसरात दहशत पसरवली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.30) रात्री मेदनकरवाडी येथे घडली.

याप्रकरणी विनोद मंगल पाटील (वय 43 मेदनकरवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी गणेश किसन जोगदंड (वय 21) तुषार विकास सोनवणे (वय 19), मनोज विनयकांत शर्मा (वय 27), नागेश बळीराम चीम (वय 21, सर्व राहणार चाकण) यांना अटक केली आहे. तर आशुतोष टिपाले, फारुख पठाण,ऋतिक कोरे उर्फ नन्या, विशाल, वैभव भाकरे व त्यांचे तीन ते चार साथीदार यांच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे व परिसरात दहशत पसरवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jayant Patil : प्रकाश सोळंखे यांच्याबद्दल अजित पवार यांना जिव्हाळा असता तर त्यांना मंत्री केले असते..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीचा कट लागला या किरकोळ कारणावरून आशुतोष व फारुख हे त्यांच्या इतर साथीदारांना घेऊन फिर्यादीच्या घरात गेले व त्यांनी फिर्यादीचा मुलगा पराग यास घराबाहेर ओढत आणत मारहाण केली व कोयते व लोखंडी दांडक्याने पाटील यांच्या दुचाकीची तोडफोड करत कोयत्याने घरातील दरवाजा व इतर सामानाची ही तोडफोड केली.

तसेच आशुतोषने आज तुला संपवतोच म्हणत फिर्यादीच्या पायावर कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी परिसरात शिवीगाळ व आरडाओरड करत दहशत पसरवण्यात आली. चाकण पोलिसांनी तिघांना अटक केली असून पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.