Chakan accident : भरधाव बसने दुचाकीस्वार महिलेस चिरडले

एमपीसी न्यूज : भरधाव खाजगी बसने दुचाकीस्वार महिलेस चिरडल्याची घटना चाकण- आंबेठाण रस्त्यावर रानवारा हॉटेल समोर बुधवारी (दि.28) रात्री दहाच्या सुमारास घडली. अपघातानंतर पळून गेलेल्या बस चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वंदना विलास पाटोळे ( वय – 44, रा. साई साम्राज्य सोसायटी, चाकण , मूळ रा. खरोशी , ता. खेड ) असे या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे.(Chakan accident) विराज पाटोळे यांनी याप्रकरणी चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे. वंदना पाटोळे या बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून ( क्रमांक एम एच 14 डी के 3069) चाकण आंबेठाण रस्त्याने जात असताना पाठीमागून आलेल्या खाजगी बसने ( क्र. एम एच 12 डी टी 9016) दुचाकीस्वार पाटोळे यांना चिरडले.

BJP mission Baramati : भाजपच्या मिशन बारामतीला आणखी बळ, राष्ट्रवादीच्या आक्रमक महिला आर्चना पाटील यांचा भाजपात प्रवेश

अपघातानंतर बसचा चालक बस सोडून पळून गेला. स्थानिकांच्या मदतीने जखमी पाटोळे यांना रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.(Chakan accident) पळून गेलेल्या बस चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातात ठार झालेल्या वंदना पाटोळे चाकण मध्ये एका नामांकित पतसंस्थेच्या कलेक्शनचे काम करत होत्या. त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.