Chakan : गॅस टँकरची दुचाकीला धडक दोघे गंभीर

एमपीसी न्यूज – गॅस टँकरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. 10) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चाकण येथे घडली.

महादेव निवृत्ती पवार (वय 55) व प्रांजल (वय 8, दोघे रा. उंबरे, ता.भोर) अशीे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सदाशिव भिकाजी देवकर (वय 54, रा. उंबरे, ता.भोर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मजाहिर बशात बुसेन (रा. मारवाडी चर्च, चेंबुर कॅम्प, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी महादेव पवार हे आपल्या दुचाकीवरून जात होते. त्यांच्या दुचाकीवर आठ वर्षांची प्रांजल व फिर्यादी सदाशिव हे होते. या वेळी गॅस टँकरने (एम एच 03 / बी जी 0183) महादेव यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील महादेव यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच हात व खांद्याला जबर मार लागला. पाठीमागे बसलेल्या प्रांजललाही किरकोळ दुखापत झाली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.