गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

Chakan Accident : कारच्या धडकेत मोटरसायकल चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : कारच्या धडकेत मोटरसायकल चालकाचा (Chakan Accident) मृत्यू झाला. ही घटना वाकी येथे 22 जूनला पहाटे 4.45 वा घडली. याबाबत दत्तात्रेय हुंडारे (वय 49, रा. ठाकूर पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.
यातील आरोपी अमोल पवार (वय 32 वर्षे, रा. बोरसे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव) याचा पोलिस शोध घेत आहेत. फिर्यादीचा चुलत भाऊ विकास हुंडारे (वय 32 वर्षे) हा त्याच्या मोटरसायकलवरून पिंपरी बुद्रुकहून चाकणला पुणे- नाशिक हायवेने जात होता. ते वाकीमध्ये आले असता पाठीमागून नाशिकच्या दिशेने येणारा आरोपी चालवत असलेली स्विफ्ट डेसिरे कार त्याच्या मोटोसायकलला धडकली. ही कार बेदरकारपणे, बेजबाबदारपणे चालवून आरोपीने अपघात करून विकास यांना जखमी केले.
आरोपीविरोधात चाकण पोलिस ठाण्यात (Chakan Accident) भा. द. वि. कलम 304(अ ), 279, 338, 337, 427, मोटर वेहिकल ऍक्ट कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Latest news
Related news