Chakan accident News : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अपघाताची माहिती न देता टेम्पो चालक घटनास्थळावरून पळून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणा-या टेम्पोने दुचाकीला मागून धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे घडला.

संदीप नारायण घुले (वय 48, रा. हडपसर, पुणे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक प्रकाश शंकर शिंदे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात टेम्पो (छोटा हत्ती) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वासहा वाजता मयत संदीप त्यांच्या एमएच 12 / क्यूव्ही 0355 या दुचाकीवरून पुणे-नाशिक महामार्गावरून जात होते.

चाकण येथील इंडिअन ऑईल पेट्रोल पंपासमोर त्यांच्या दुचाकीला एका टेम्पोने मागून जोरदार धडक दिली. यामध्ये संदीप रस्त्यावर पडले. या अपघातात गंभीर जखमी होऊन संदीप यांचा मृत्यू झाला. तसेच त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले.

दरम्यान, अपघाताची माहिती न देता टेम्पो चालक घटनास्थळावरून पळून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.