Chakan Accident News: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भांबोली ते एचपी चौकाकडे जाणा-या रस्त्यावर सावरदरी येथे झाला.

एमपीसी न्यूज – कंपनीतून घरी जात असताना दुचाकीला अज्ञात वाहनाने मागून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात 26 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता भांबोली ते एचपी चौकाकडे जाणा-या रस्त्यावर सावरदरी येथे झाला.

ओंकार कैलास जाधव (वय 21, रा. कुरुळी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कल्याण गुरुदास पाटील (वय 47, रा. आळंदी रोड, भोसरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनावरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार जाधव हा सावरदरी येथील ब्रिस्टोन कंपनीत काम करत होता. 26 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता तो कंपनीतून घरी जात होता. दुचाकीवरून घरी जात असताना त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने मागून धडक दिली.

यामध्ये ओंकार गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच पोलिसांना याबाबत माहिती न देता पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.