Chakan Accident News : ‘पीएमपी’ बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बसने एका दुचाकीला मागून जोरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील व्यक्तीचा मृत्यू झाला. याबाबत बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 27) रात्री आठ वाजता नाशिक-पुणे महामार्गावर कुरुळी गावाजवळ घडली.

संजय गुलाब चोखर (वय 37, रा. बनकरवस्ती, मोशी) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. बाळासाहेब भाऊसाहेब सपाटे (रा. चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या पीएमपी बस चालकाचे नाव आहे. याबाबत नितीन बाळासाहेब चोखर (वय 39, रा. आदर्शनगर, दिघी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाळासाहेब हा पीएमपी बस चालक आहे. बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास तो बस (एम एच 12 / के क्यू 0184) घेऊन चाकण बाजूकडून पुण्याकडे येत होता. कुरुळी गावाजवळ बसच्या समोरून जात असलेल्या चोखर यांच्या दुचाकीला (एम एच 14 / एच इ 0894) बसने मागून धडक दिली. या अपघातात चोखर दुचाकीवरून रस्त्यावर पडले. गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.