Chakan Accident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना 14 जानेवारीला रात्री साडेबारा वाजता पुणे-नाशिक रोडवर कुरुळी गावाजवळ पायसर चौक येथे घडली.

विलास उत्तम बांडे (वय 27, रा. कोरडेमळा, ज्ञानेश्वर नगर, बोरी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत शामसुंदर नवनाथ नाईकवाडे (वय 30, रा. दगडूपाटील नगर, थेरगाव) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास बांडे दुचाकीवरून (एम एच 14 / सी ई 8896) हडपसर येथून चाकणकडे येत होता.

कुरुळी गावाजवळ आल्यानंतर पायसर चौकात अज्ञात वाहनाने बांडे याच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर बांडे याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. याबाबत 9 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.