Chakan accident : चाकण येथे कंटेनरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज : रस्ता ओलांडत असताना एकास कंटेनरने धडक दिली. (Chakan accident) त्यात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.25) रात्री चाकण-शिक्रापूर रोडवर चाकण येथे घडली.

जयकुमार संतोष राजपूत (वय 24, रा. बोरजाई नगर, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शंकर हरिभाऊ मोहिते (वय 34, रा. परतवडी, ता. माण, जि. सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत व्यक्तीची ओळख पटलेली नाही

Abdul Sattar : शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंची निवड; शिंदे गटाचा निर्णय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्ती (वय अंदाजे 40 वर्ष) रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रोड ने चालत जात होते. ते तळेगाव चौकात आले असता आरोपी शंकर मोहिते याने त्याच्या ताब्यातील कंटेनरने पादचारी व्यक्तीला जोरात धडक दिली.(Chakan accident) त्यात तो व्यक्ती गंभीर जखमी झाला. फिर्यादी हे रुग्णवाहिका चालक असून त्यांच्या रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.