Chakan raid: वेश्या व्यवसाय प्रकरणी चाकण-आळंदी रोडवरील लॉजवर छापा

एमपीसी न्यूज : वेश्या व्यवसाय प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 13) दुपारी चाकण-आळंदी रोडवर वरील लॉजवर करण्यात आली.(Chakan raid) यामध्ये पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली आहे.

रामेश्वर जीवन घोडके (वय 27, रा. आळंदी. मूळ रा. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pavana Dam: पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली; पवना धरण 99 टक्के भरले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. त्यांच्याकडून एस के लॉजमध्ये वेश्या व्यवसाय करून घेतला आणि त्यावर आपली उपजीविका भागवली. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा मारून कारवाई करत आरोपी घोडके याला अटक केली.(Chakan raid) यात 20 आणि 35 वर्षीय दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.