Chakan : घरात घुसून जेवण करत असलेल्या एकावर कुऱ्हाड , कोयत्याने हल्ला

एमपीसी न्यूज – कुटुंबासोबत जेवण करत असलेल्या एकावर चार जणांनी मिळून कु-हाड आणि कोयत्याने हल्ला केला. तसेच त्याच्या पत्नीला धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 4) रात्री साडेआठ वाजता चाकण येथिल आंबेठाण चौक येथे घडली.

अमर दिलीप गायकवाड (वय 29, रा. आंबेठाण चौक, ता. खेड. मूळ रा. तीर, ता. जि. सोलापूर) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), गणेशचा भाऊ (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), एक अनोळखी इसम आणि पवन दिलीप टमट्टा (वय 18, रा. रघुवेंद्र इंटरप्रायझेस या कंपनीमध्ये. मूळ रा. नेपाळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पवन याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शनिवारी रात्री त्यांच्या कुटुंबासोबत घरात जेवण करत होते. त्यावेळी आरोपी बेकायदेशीरपणे फिर्यादी यांच्या घरात आले. काहीही कारण नसताना आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या पत्नीला शिवीगाळ केली. फिर्यादी यांना कु-हाड आणि कोयत्याने मारहाण केली. यात फिर्यादी यांच्या डोक्यात आणि पायावर गंभीर दुखापत झाली. तसेच आरोपींनी फिर्यादी यांच्या पत्नीला देखील धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.