Chakan: शेळ्या चारण्यासाठी शेतात आलेल्या वृद्ध नागरिकाला बेदम मारहाण

Chakan: An elderly man who came to the field to graze goats was beaten to death सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादी वसंत नवघणे हे त्यांच्या शेळ्या घेऊन शेतामध्ये चारण्यासाठी गेले होते.

एमपीसी न्यूज – शेळ्या चारण्यासाठी स्वतःच्या शेतात गेलेल्या एका वृद्ध नागरिकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामध्ये वृद्ध नागरिक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 20) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील महाळुंगे येथे घडली आहे.

वसंत देवजी नवघणे (वय 72, रा. म्हाळुंगे, ता. खेड) असे जखमी वृद्ध नागरिकाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बाळू भगवंत नवघणे (रा. म्हाळुंगे, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादी वसंत नवघणे हे त्यांच्या शेळ्या घेऊन शेतामध्ये चारण्यासाठी गेले होते.

त्यावेळी तिथे आरोपी बाळू आला. तू माझ्या वडिलांना मारले आहे, असे म्हणत बाळू याने वसंत यांना जमिनीवर ढकलून दिले. तसेच त्यांच्या हातातील काठी हिसकावून घेत त्यांना बेदम मारहाण केली.

यामध्ये वसंत नवघणे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.